शोधाशोध

Wednesday, January 27, 2010

सौंदर्याची खाण पाहिली आम्ही पहिल्यांदा ; Maharashtrian Beauty Ready to Enter into Bollywood

सध्या मराठी माणसं अटकेपार झेंडा लावण्यात मग्न आहेत, हे बघून मन अगदी भरून येतं. मराठी चित्रपट तर कमाल दाखवत आहेतच पण मराठी कलाकारही सर्वत्र लखलखत आहेत. माझ्या मागच्याच पोस्ट मध्ये मी , 'जोगवा' या मराठी चित्रपटाला या वर्षीचे ५ राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचं सांगितलं. त्याचबरोबर, 'गंध' या मराठी चित्रपटाला देखील २ राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.

पण खरी गंमत जी मला तुम्हाला मला सांगायची , ती आपल्या मराठी मिडिया पर्यंत अजून पोचली नसावी कदाचित.. कारण त्याविषयी कुठल्याही वर्तमान पत्रात किंवा टि.व्ही. वर अजून काहीही दाखवण्यात आलेलं नाही.

आता जास्त ताणून न धरता सांगून टाकतो......तर बातमी अशी आहे कि........
यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा जो बंगाली चित्रपट आहे,
त्याचं नाव आहे :- ' अंतहीन '. आणि या चित्रपटात नायिकेच्या प्रमुख भूमिकेत जी नटी आहे, ती मराठी आहे , आपल्या पुण्याची आहे , तीचं नाव : राधिका आपटे.

पुण्यात जी 'आसक्त' नावाची नाट्यसंस्था आहे , त्यातली आहे ती. त्यामुळे मराठी नाटक, एकांकीका, चित्रपट, वगैरे करते ती. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या , 'समांतर' नावाच्या एका मराठी चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचं समीक्षकांनी चांगलं तोंडभरून कौतुक केलंय. पण तरीही अजून आपल्या मराठी मिडियाची नजर तिच्यावर कशी नाही पडली याचं मला आश्चर्य वाटतंय. तिची मुलाखत बघायला आवडेल मला टि.व्ही. वर.

सध्या तिच्या अभिनयाचं अख्ख्या बंगाल मध्ये प्रचंड कौतुक होतंय, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे तिथेले लोक आपल्या मुंबईतल्या हिंदी-ईंग्रजी मिडियासारखे कोत्या मानाचे नाहियेत , हे बघून खूप आंनद वाटला.

तर राधिका आपटेच्या पुढच्या प्रवासाला चांगल्या भरघोस शुभेच्छा !

हिच ती मराठी सौंदर्यवती.... राधिका आपटे !

0 comments:

मित्रांना देखील कळवा