शोधाशोध

Monday, February 8, 2010

मराठीत नव्याने सुरू होणारी टि.व्ही. चॅनल्स हा मराठीच्या आंदोलनाचा पहिला मोठ्ठा विजय

महाराष्ट्रात येणार्या दिवसांत काय होणार आहे हे देवालाच माहीत... हाती येणारी प्रत्येक बातमी अशी काही भयानक स्वरूपात येते की त्या माहितीचा आनंद लुटावा कि दु:ख व्यक्त करावं , हेच कळेनासं झालंय.

आता मी कुठल्याही प्रकारचं प्रास्तविक करण्याच्या मूडमध्ये नसल्याने थेट मुद्द्याचं बोलतो...
महाराष्ट्रात आधी दूरदर्शन हे एकमेव टि.व्ही. चॅनल होतं, आता त्यात प्रगती होत होत, हळू हळू बाकीची चॅनल्स येत गेली आणि मराठी चॅनल्सचा पसारा वाढत गेला. १०-११ वर्षांपूर्वी झी टि. व्ही. ने मराठीत प्रथम 'अल्फा मराठी' नावाने मराठी चॅनल सुरू केलं, त्यच्याच मागेपुढे काही कालावधीने मग, ' टि.व्ही' हे मराठी चॅनल सुरू झालं. तेव्हापासून आज पर्यंत मराठी चॅनल्सचा पसारा बर्यापैकी वाढलाय.
म्हणजे सध्या मराठीत पुढील प्रमाणे टि.व्ही. चॅनल्स कार्यरत आहेत :

सह्याद्री (दूरदर्शन)
झी मराठी
मराठी
मी मराठी
स्टार प्रवाह
झी टॉकीज
साम मराठी
स्टार माझा
आय्.बी.एन. लोकमत
झी चोवीस तास

यांपैकी जवळपास सगळ्या चॅनल्सचे मालक अमराठी आहेत. (माझा मुद्दा इथे वेगळा आहे, त्यांच्या मराठीपणाबद्दल नाही. ) मला असं म्हणायचं आहे की , महाराष्ट्रात एवढे श्रीमंत मराठी उद्योगपती असतानादेखील एकही मराठी माणूस या उद्योगात का उतरत नाही ? आज देशात मनोरंजन क्षेत्रात अब्जावधी रुपयांची उलाढाल होते आहे, म्हणून मोठ्या प्रमाणावर 'बाहेरील' मंडळी इथे घुसतायत आणि महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेवर त्यांची पकड घट्ट रोवून उभे राहतायत. त्यांचं 'प्रस्थ' वाढत चाललंय. न्यूज चॅनल काढणं हे आज एक फॅड होऊन बसलंय. सरळ एखादि कंपनी रजिस्टर करून घेतात, प्रेस चं लायसन्स, वगैरे कागदपत्रं मिळवतात आणि मग यांचं न्यूज चॅनल सुरू...... आणि त्यात बिनडोक, वाचाळ , पक्षपाती, कृतघ्न, स्वार्थी आणि जनावरांपेक्षा हिन दर्जाची लोकं आणून बसवली जातात, १२५ कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात ज्यांना बाकीचे उद्योग सोडून महाराष्ट्राच द्वेष करणं, हे फार मोठं देशभक्तीपर काम वाटतं. आणि आपले लोक काहीही करत नाहीत, कारण त्यांना या गोष्टींची कधी माहितीच नसते. पत्रकारीतेचा काहीही अनुभव नसताना, पत्रकारितेच्या पदव्या विकत घेऊन कित्येक नवख्या तरूण-तरूणींना अशा टि.व्ही चॅनल्स वर आणि रेडीओ चॅनल्स वर मोकळं सोडलेलं असतं. विशेषतः त्या त्यांच्या .सी. स्टुडीओतल्या तरूणी- ज्यांच्या चेहर्यावर मेक-अप कमी आणि माज जास्त चढलेला असतो. त्यांच्या रेडीओ चंनल्स वर कधीही मराठी गाणी नसतात, मराठी न्यू़ज चॅनल असून सुद्धा त्यावर कधी मराठी बातम्या नसतात. त्यांच्या चॅनल्स मध्ये खास त्यांच्या राज्यातून आलेले लोक ते भरतात. मराठी तरूणांना संधी नसते.

यांच्याविषयी आपल्या लोकांकडे काय योजना आहेत ? कसं काय आवरणार यांना...... एखादा श्रीमंत मराठी माणूस का नाही उतरत या क्षेत्रात ? आणि का नाही चालू करत टि.व्ही चॅनल्स ? आणि जे उतरलेत त्यांना सुद्धा नीटसं झेपत नाहिये, शरद पवारांचा आणखी एक पुतण्या अभिजीत पवार या क्षेत्रात उतरला, आणि एक चॅनल काढलं - साम मराठी, पण काहीही उपयोग नाही. शेवटी तिथेही हे लोकच भरलेत. कांचन अधिकारी यांनी भव्यदिव्य उद्घाटन करून 'मी मराठी' सुरू केलं, पण त्याचीही घौडदौड हळू हळू चालली आहे.

झी उद्योगसमूहाचा मालक अमराठी असला तरी त्यांनी झीची धुरा मराठी माणसाच्या हातात दिली आहे, म्हणजे झी च्या आख्ख्या देशातल्या सगळ्या चॅनल्स चा अध्यक्ष त्यांनी एका मराठी माणसला नेमलंय. झी मराठी-झी चोवीस तास- झी टॉकीज च्या रूपाने झी ने खरोखरच १० वर्षांपासून मराठीची शान राखली आहे. तेव्हा त्यांच्याबद्दल बोलायला कुठेही जागा नाही. कौतुक करावं तेवढं थोडं. त्याचप्रमाणे रामोजी राव, यांचं 'ई मराठी' , आणि स्टार समूहाची - स्टार माझा, स्टार प्रवाह. आणि शेवटचं आय्.बी.एन. लोकमत.

बरं , हे टी.व्ही. चॅनल्स विषयी एवढं सगळं रामायण लिहिण्यामागचं खरं कारण म्हणजे मराठीत आता नव्याने येऊ घातलेली टि.व्ही. चॅनल्स. त्यांचं झालंय असं..... की हा सगळा टी.व्ही. चॅनल्स चा खेळ एका शब्दावर चालतो म्हणजे- टि.आर्.पी. [टि.आर्.पी. म्हणजे टि.व्ही. वरच्या कार्यक्रमांची लोकप्रियता मोजण्याचं एक प्रमाण आहे ते. टि.आर्.पी. जितका जास्त तितका तो कार्यक्रम लोकप्रिय] . तर गेल्या वर्षभरापासून विशेषतः मराठी माणूस आंदोलनाने मध्यंतरी जो वेग घेतला आणि आख्खा देश व्यापला. त्याचे परिणाम असे दिसून आलेत की, मराठी माणूस खर्‍या अर्थाने जागा झाला आहे, मराठी लोकांनी हिंदी कार्यक्रम बघणं अचानकपणे सोडून दिल्याने हिंदी कार्यक्रमांचा टि.आर्.पी धाडकन जमिनीवर कोसळला आहे, तो काही केल्या वर यायला तयार नाही.

स्टार प्लस, कलर्स, वगैरे सारख्य सर्वाधिक लोकप्रियता खेचणार्‍या टि.व्ही. चेनल्स चे रोजचे ब्लॉकबस्टर शो सुद्धा जमिनदोस्त झालेत. मराठी प्रेक्षक आता मराठी कार्यक्रम आनंदाने बघतात, त्यात झीच्या सारेगमप लिटल चॅम्प्स ने मागच्या वर्षी हिंदी चॅनल्स चा आंतर्राष्टीय स्तरावर धुव्वा उडवला होता. तेव्हापासून तर मराठी टि. व्ही. चॅनल्स ने जो वरचा गियर टाकला तो आजतागयत कायम आहे.

या सगळ्या गदारोळात टॉपला असणार्या बाकिच्या सिरियल्स आणि बिग बॉस, वगैरे मोठमोठे टि.व्ही. शोज सुद्धा दणदणीत आपटलेत. आणि ह्यात भर म्हणून कि काय मराठी माणसाने हिंदी चित्रपट बघणं सुद्धा बंद केलंय, त्यामुळे बॉलीवूड ला प्रचंड नुकसान झालंय. त्यात मराठी चित्रपट इतके उत्त्म यश मिळवतायत, ऑस्कर ला जातायत, राष्ट्रीय पुरस्कार मिळवतायत, त्यामुळॅ तिकडे नुसता धूर निघतोय कुठून कुठून ......काय विचारू नका काय चाललंय ते. ... पण जे चाललंय, ते 'लै भारी' चाललंय. आता समजलं का तुम्हाला , मराठी कडे बघून नाकं का मुरडतायत ते ? आणि महाराष्ट्राची रात्रंदिवस बदनामी का चालवली आहे ती ?

महाराष्ट्रात आता अनेक बड्या कंपन्या येतायत, चित्रपट निर्मितीमध्ये उतरातायत आणि टि.व्ही. , रेडीओ मध्ये सुद्धा उतरतायत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे :-

१) रिलायन्स उद्योग समूह (अनिल अंबानी) हे ३ मराठी टि.व्ही. चॅनल्स काढतायत :
बिग गौरव (मनोरंजन वाहिनी, सिरियल्स ,वगैरे साठी)
बिग चित्रपट (झी टॉकीज सारखं, दिवसभर फक्त चित्रपट)
बिग मराठी न्यूज (२४ तास बातम्या)

२) सहारा मराठी ( सिरियल्स )
३) 9X मराठी ( २४ तास बातम्या ) शक्यता कमी आहे.
४) संध्या म्रराठी
५) आमची मुंबई ( २४ तास बातम्या )
६) TV 9 ( २४ तास बातम्या )
७) P7 ( २४ तास बातम्या )
८) संगीत मराठी ( २४ तास गाणी, MTV सारखं )
९) मित्र मराठी ( २४ तास गाणी , MTV सारखं )
१० ) शाईन मराठी ( २४ तास गाणी, MTV सारखं )
११ ) कार्टून नेटगोल्ड ( २४ तास कार्टून्स )

तर अशी सगळ्या प्रकारची एकूण १३ ते १५ टि. व्ही. चॅनल्स घडाधड सुरु होणार आहेत.
याचा अर्थ 'फरक पडतोय' .... त्यांना मराठी माणसाची किंमत कळायला लागली आहे..... वणवा खरचंच पेट घेत आहे........

जय हिंद , जय महाराष्ट्र !

5 comments:

Narendra prabhu on February 8, 2010 at 1:52 PM said...

हा वणवा पेटलाच पाहीजे. छान माहिती दिलीत. धन्यवाद.

Sudarshan Apte on February 9, 2010 at 12:25 AM said...

आई शप्पथ खूपच भारी माहिती मिळाली आहे.
ब्लॉग आवडला.

सुदर्शन

मराठी आवाज on February 11, 2010 at 12:56 PM said...

@ नरेंद्र आणि सुदर्शन...
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !

सुनिल सावंत on February 11, 2010 at 6:21 PM said...

मस्त लिहलय ... आवडल... हे सगळ होणारच होत, आणि उत्तरोत्तर अधिकाधीक होत जाणार हे नक्की. बॉलीवूड मुम्बैई ला पोसतय म्हणणार्‍यान्च्या तोन्डावर हे सगळ फ़ेकून मारायला छान आहे...

Kapil Paraji More on February 14, 2010 at 3:10 AM said...

great analysis..and nice informations...your writing style is also nice and nice effort....thanks

मित्रांना देखील कळवा