शोधाशोध

Thursday, February 4, 2010

हिंदी आणि इंग्रजी मिडियावर , न्यूज चॅनल्स वर बंदी आणण्याचा मार्ग

पाणी आता डोक्याच्या वर जातंय असं नाही का वाटत ?
गेले काही दिवस रोज हे हिंदी-इंग्रजी चॅनलस वाले, मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची रात्रंदिवस बदनामी करतायत. आणि आपले मराठी राजकीय नेते, पत्रकार, मिडिया किंवा इतर संबंधित लोक काहीच कसं करत नाहीत ? सकाळी उठल्यावर टि.व्ही. लावा किंवा अगदी झोपताना टि.व्ही . लावा, तेच तेच पाहून कंटाळा नाही येत ? वाईट नाही वाटत ? दु:ख नाही का होत ?

ज्या गोष्टी आपले राजकीय नेते बोललेच नाही, त्या गोष्टी त्याचा विपर्यास करून दाखवल्या जातायेत आणि आख्खा देश मराठी माणसाचा तिरस्कार करतोय. प्रत्येक चॅनल मराठी माणसाची लक्तरं वेशीवर टांगायला निघालेत. या हिंदी-इंग्रजी मिडियाला थांबवत का नाही कुणी ?

या वर्षी महाराष्ट्राला ५० वर्षं पूर्ण होतायत, तसंच गुजरातला देखील ५० वर्षं पूर्ण होतायत. गुजरात सरकारने या कारणास्तव सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन वर्षभर वेगवेगळे कौतुक सोहळे ठेवलेत, उत्सव आयोजित केले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रात बघा काय चाललंय.

आज देशात मराठी-अमराठी चा जो वाद निकोपाला गेलाय, १०१% टक्के हे चॅनलवाले कारणीभूत आहेत. त्यांनी राजकीय नेत्यांची भाषणं मुद्दाम विष घालून पसरवली. जे भांडण केवळ दोन पक्षापुरतं मर्यादित होतं त्याला राष्ट्रीय स्वरूप दिलं, आणि त्यामुळे अनंत गैरसमज निर्माण होऊन त्यातून हि भांडणं उभी राहिलीयेत.

त्यामगच< आणखी एक व्यावहारीक कारण म्हणजे..... न्यूज चॅनल्स चा टि. आर. पी.
त्यांचं झालंय असं, की मराठी माणूस या आंदोलनामुळे , आपला मराठी माणूस थोडा का होईनात जागा झाला, आणि त्यांचा फायदा असा, की मोठ्या प्रमाणावर लोक हिंदी ऐवजी मराठी चॅनल्स बघायला लागले आणि हिंदी -इंग्रजी चॅनल्स लोक बघेनासे झाले, आणि त्यामुळॅच सगळ्यात जास्त बिझिनेस देणार्‍या महाराष्ट्रात हिंदी -इंग्रजी चॅनल्स चा टि.आर्.पी. खूपच खाली आलाय, असं दिल्लीत बसलेल्या हिंदी-ईंग्रजी तज्ञांचं मत आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना प्रचंड घाम फुटलेला आहे. आणि म्हणून मराठी माणूस या विषयावर काही दाखव्लं नाही , तर यांचं चॅनल कुत्रं सुद्धा बघत नाही. पण मराठी माणसाविषयी चांगलं कसं लिहायचं ? म्हणून मग त्यांनी आपली बदनामी करायला सुरूवात केली आहे. हे लोक इतके हरामखोर असतील असं वाटलं नव्हतं, पण ही खरी गोष्ट आहे.
कारण जेव्हा जेव्हा ते लोक, शिवसेना, मनसे, ठाकरे आणि मराठी माणूस या विषयी काहीही त्यांच्या फडतूस चॅनल्स वर दाखवतात ना, तेव्हा आख्खा देश आपापले कामंधंदे सोडून ते बघत बसतो, हे आता त्यांना कळून चुकलंय. कारण तेव्हा त्यांचा टि.आर. पी. हा गगनाला भिडलेला असतो.
या मराठी माणसाला शिव्या घालून आणि त्याची यथेच्छ बदनामी करून करूनच यांचा टि.आर.पी. वाढतो आणि या मुळॅच त्यांची चॅनल्स चालतात, मराठी माणसाविषयी हे विष आख्ख्या देशात हे पसरवतात आणि त्याचं खापर मात्र महाराष्ट्रावर, आणि आमच्या नेत्यांवर.
भारतीय असूनही एवढे निर्लज्ज आणि कृतघ्न कसे वागू शकतात हे लोक ?

आजपर्यंत आख्खा देश मराठी माणसाला , मोठ्या मनाचे, दिलदार, कलाप्रेमी, क्रीडाकुशल, शूरवीर, धाडसी, ई, ई, म्हणुन ओळखत होता, तोच देश आता मराठी माणसाला, भिकारी, गरीब, स्वार्थी, तिरसट, भांडखोर, थर्ड क्लास, कोत्या मनाचा, आणि देशद्रोही-समाजद्रोही म्हणुन ओळखायला लगलाय, याला सर्वस्वी जबाबदार केवळ हे न्यूज चॅनल्स वाले आहेत, ज्यांनी चुकीच्या बातम्या विष पेरून दाखवल्या आणि समाजात तेढ निर्माण केली.

महाराष्ट्रात जन्माला येणार्‍या नव्या पिढीला तर आमही समजावू शकू की सत्य काय आहे, पण देशात इतरत्र वाढणार्‍या तरूणांना- आणि नव्या पिढीला हे कोण जाऊन समजावणार. ते जे टि.व्ही. वर बघतात, त्यालाच तर सत्य समजणार आणि मग मागचा पुढचा कसलाही विचार न करता ते सुद्धा आपल्या विरुद्धच बोलणार, हातात शस्त्र घेऊन इथे येणार, विद्रोही होणार. याला जबाबदार कोण ?

आजवर मराठी कलाकारांनी, खेळाडूंनी, राजकारण्यांनी, लेखक-साहित्यिकांनी , इ. सगळ्यांनी जे जे कल्पानातीत यश मिळवलंय, जे कर्तुत्त्व करून ठेवलंय , त्याचा आता हळू हळू देशाला विसर पडत चाललाय. आणि बहुधा हेच त्यांना हवंय, म्हणुनच ते रात्रंदिवस महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर तुटून पडलेले असतात. की जेणे करून लोकांना आता मराठी हा शब्द ऐकला तरी कंटाळा यावा , आणि आपला पराकोटीचा तिरस्कार वाटावा.

यांना वेळीच आवरायला हवं , आणि त्यांचा माज कायमचा उतरवायला हवा. आणि तो ही व्यवस्थित विधायक मार्गाने, कायदेशीर पणे. त्यांच्या चॅनल्सची तोडफोड करून निष्कारणी पोलीसांची लफडी मागे लावून घेण्यापेक्षा कायदा वापरा. चढो... (सॉरी ...लढो ) मगर कायदेसे....

आता तुम्हाला प्रश्नं पडेल कि कसं ? तर त्यांचं उत्तर आहे माझ्याकडे ,
उदाहरण घ्यायचं झालं तर आपण , मनसेचं घेऊ. आतापर्यंत राज ठाकरे यांनी जी जी भाषणं केली , त्यात ते जे काही बोलले त्याचा चुकीचा अर्थ ह्या हिंदी-इंग्रजी चॅनल्स लावला आणि आख्ख्या देशभर गैरसमज पसरवले, ही जगजाहीर गोष्ट आहे. त्यामुळे मनसैनिकांनी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांनी, चाहत्यांनी, वगैरे, सरळ सरळ , त्या सगळ्या न्यूज चॅनल्स वर कोर्टात केसेस दाखल करायच्या.

राज ठाकरेंच्या भाषणांची हिंदी-इंग्रजी चॅनल्स वरची फुटेजेस तयार ठेवा, ती कोर्टात पुरावा म्हणून सादर करता येतील, की बघा, आमचा नेता अमुक अमुक बोलला, आणि त्याचा या न्यूज चॅनल्स त्यांच्या मनाने अर्थ लावला आणि तिखट-मीठ लावून , कडवटपणा टाकून, चुकीची माहिती आख्ख्या देशभर पसरवली. आणि त्यामुळे दोन समाजात कायमस्वरूपीची तेढ निर्माण झाली, आणि कायदा व सुव्यवस्था बिघडली. त्यामुळे या न्यूज चॅनल्स वर आणि खोट्या बातम्या आणणार्‍या बातमीदारावर, संपादकावर आणि कॅमेरामनवर सुद्धा कायमस्वरूपी किंवा काही वर्षांपुरती बंदी आणावी. रस्त्यावर येतील तेव्हा अक्कल ठिकाण्यावर येईल.

नुकतीच दक्षिण भारतात अशा २ टि.व्ही. चॅनल्स वर त्रासलेल्या लोकांनी खटले दाखल केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे कोर्टाने देखील त्वरीत हालचाली सुरू केल्यात तिथे, त्यामुळे लवकरच ते चॅनल आणि त्यांचे पत्रकार रस्त्यावर येतील नाहीतर सरळ 'आत' जातील.

अरे, हो....... सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली.....कलमं. भारतीय दंडविधान नुसार , IPC Section 153-A (दोन समाजात तेढ निर्माण करणे) आणि 505[2] (अफवा पसरवणे आणि चुकीची माहिती देणे) ....या कलमा अंतर्गत त्यांच्यावर खटले दाखल करता येतील. कायद्यातलं मला फारसं काही कळत नाही, त्याबाबत योग्य त्या माणसाचा सल्ला घेऊन मगच पाऊलं उचलावीत. पण कृपा करून आता वेळ वाया घालवू नका. .........

8 comments:

साधक on February 4, 2010 at 9:19 PM said...

नेमका हाच विचार माझ्या मनात काल आला. राज ठाकरे या वाहिन्यांवर खटले का दाखल करत नाहीत. सगळे जण मूग गिळून का गप्प बसले आहेत?

विशाल तेलंग्रे on February 4, 2010 at 11:40 PM said...

एकदम सही... अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मुद्दे मांडलेले आहेत.. विचार करतोय वाचून... तुमची लेखनशैली खुप आवडली.. या विषयावर मी तुमच्याशी पुर्णपणे सहमत आहे.

- विशल्या!

Unknown on February 5, 2010 at 10:05 AM said...

राहुल गांधी यांनी त्यांच्याच आजोबांनी योजलेली भाषावार प्रांतरचना म्हणजे काय, याचा खुलासा करावा. मुंबई सगळ्यांची - मग ती महाराष्ट्राची राजधानी म्हणजे काय, याचा बेंगळुरू आणि कोलकात्याचा तुलनात्मक अभ्यास करून आम्हाला समजावून द्यावं!

विक्रम एक शांत वादळ on February 5, 2010 at 11:22 AM said...

are vah mast post
tumhi je bolat aahat te akdum khare aahe ya hindi channel walyanich jada aag lavali aahe saglya prakarnat yana dhada shikvlyashivay he thikanavar yenar nahit \

मराठी आवाज on February 5, 2010 at 2:50 PM said...

@ साधक, विशाल, कौशल , आणि विक्रम.

प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

अहो, कुणीतरी या गोष्टी बोलायलाच हव्यात आणि नुसत्या बोलून उपयोग नाही, तर त्या योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवायला हव्यात, आणि सर्वांत मुख्य म्हणजे त्या योग्य व्यक्तींनी त्यावर काही ठोस पाऊलं उचलायला हवीत, तरच काही उपयोग होईल.
नाही का ?

Sachin Agre on February 10, 2010 at 6:00 PM said...

The same thought had come in my mind......Really someone has to do it at earliest before News channels get more MAD

THANTHANPAL on February 11, 2010 at 8:52 PM said...

राहुलने बिहारींनी युपी ने महाराष्ट्राला वाचवले आस प्रचार खोटा केला तेंव्हा उलट इंदिरा गांधी च्या राजकारणामुळे पंजाब पेटला होता तेंव्हा महाराष्ट्राच्या जनरल अरुण वैद्य यांनी ऑपरेशन यशस्वी करून पंजाब वाचवला,तसेच मराठा बटालियन चा २४० वर्षाचा इतिहास का नाही सांगितला. आंदोलन न करता फक्त मोठे डिजिटल बनर लावले असते तर जगाला महाराष्ट्र काय आहे समजले असते.चीन च्या संकटात सह्याद्री यशवंतरावजी हिमालयाच्या मदती साठी धावले होते या गोष्टी हे आंदोलन करणारे का मांडत नाही.केवळ मराठी-मराठी करून फुट पाडु नका raj
१५) राज च्या मराठी प्रेमा बद्दल शंका येते . आमदारांचे निलंबन मागे घेण्या साठी राज ने तडजोड केली असेल. बच्चन चा या वादाशी संबध नाही.याला या वादात ओढून राज जुने हिशोब पूर्ण करत आहे. त्याच प्रमाणे राज कडे कोण काम करतात हे सुद्धा त्याने जाहीर केले नाही. मराठी माणसाचा शत्रू मराठी माणूसच आहे. राज आंदोलन करतो तर उद्धव गप्प बसतो, आणि उद्धव आंदोलन करतो तर राज गप्प बसतो यांच्या भांडणात मराठी माणसाचे नुकसान होते. दक्षिणेत जेंव्हा असे होते तेंव्हा सर्व नेते एक होतात.यामुळे यांनी एकत्र यावे किंवा मराठी सोडावे

Anonymous said...

nete ani baki pakshanche sodun dya pan jevha he channel wale "shivaji maharajancha" ullekh jevha karaycha asto tevha fakt "shivaji" asa kaartat tevaha mala sarvat jast dukh hote jya rajyala sampurna jati ani samajane maharastrat manane stan deley tyachi ashi thata he maharastra vishayichi tyanchi krutadyata darshawat asete.



"shivaji maharajana" maharaj bolnasathi fakt marathi asle pahije ka?


nirniralya social sites war amchya rajanwar ani freedom fighter war tika kelya jatat karan fakt te marathi hote.

tyancha kai sambandh mns,ss,ncp,congress,bjp shi he ya lokana kon samajawanar...........

मित्रांना देखील कळवा