शोधाशोध

Sunday, February 7, 2010

इंग्रजी न्यूज चॅनलवर माधुरी दिक्षितने गायली मराठीतून अंगाई

मागच्याच वर्षी माधुरी दिक्षितला पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यावेळी सगळ्या पत्रकारांशी ती मस्तपैकी मराठीत बोलली आणि आख्ख्या महाराष्ट्राची मनं जिंकून घेतली. त्याचे काही हे गौरवाचे क्षण.....

त्याचं काय आहे, गेला आठवडाभर टि. व्ही. वर मराठीच्या अब्रूची वेशीवर टांगलेली लक्तरं पाहून मन अगदी विषण्ण झालं होतं, तेव्हा इंटरनेटवर सहज फेरफटका मारता मारता हे गोड क्षण माझ्या दृष्टीस पडले, ते पाहून जरा मनाला थोडं बरं वाटलं, म्हणून मग म्हटलं तुम्हालादेखील आवडेल...

त्याआधी एक गोष्ट खास म्हणून सांगतो, आपल्याकडे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर आजची मराठी तरुण पिढी मराठी बोलायला लाजते, बरेचसे मराठी पालक आपल्या मुलांना मराठीत बोलायला शिकवत नाहीत . मराठीत बोलणं हे त्यांना गरीब आणि दळभद्री माणसाचं लक्षण वाटतं.. अशा सगळ्या निर्लज्ज मराठी लोकांना मला आवर्जून सांगायचं आहे......की ...

चित्रपटविश्वातील आख्खं जग जिच्या पायाशी लोळण घेतं , ती लावण्यवती, सौंदर्यवती, नृत्यसम्राज्ञी माधुरी दिक्षित हिला आपल्या मातृभाषेचा- मराठीचा प्रचंड अभिमान आहे, अमेरिकेत राहून सुद्धा तिच्या घरात ती मराठीतच बोलते आणि विशेष म्हणजे तिच्या अमेरिकेत जन्मलेल्या (म्हणजे इंग्रजाळलेल्या) दोन्ही मुलांना ती आणि तिचा नवरा स्वतः मराठी शिकवतात.

मला तर असं वाटतं की अमेरिकेत जर मराठी शाळा असती तर तिने नक्की तिच्या मुलांना मराठी शाळेत घातलं असतं. आपल्या भारतात राहणार्‍या आणि मराठीत बोलायची लाज वाटणार्‍या लोकांना सांगा हे.... म्हणावं याला म्हणतात मराठी प्रेम.

तर हेच ते, माधुरी दिक्षित मराठीत बोलतानाचे काही गोड क्षण :-

१) माधुरी दिक्षित आणि तिचे पतिराज :-


२) माधुरी दिक्षितने तिच्या मुलांसाठी गायलेली मराठी अंगाई :-


३) माधुरीने गायलेलं मराठी गाणं :



काय वाटलं ना बरं मनाला.......???

0 comments:

मित्रांना देखील कळवा