शोधाशोध

Thursday, February 11, 2010

बॉलीवूड आता लवकरच बिहारला स्थायिक होणार

शिवसेना आणि मनसे यांना कंटाळून बॉलीवूडकर मंडळी म्हणे आता बिहारचा रस्ता धरणार आहेत. बिहार सरकारने यासाठी फार मोठ्या प्रमाणावर खर्च करून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मोठमोठे स्टुडीओ, शूटींग साठी लागणार्‍या आवश्यक सोयी-सुविधा याचा अभ्यास आता अंतिम टप्प्यात आला आहे. आता बिहारमध्ये आधी इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील आणि मग एक एक करून मुंबईतली सगळी कामं बिहारमध्ये हलवण्यात येणार आहेत.

लवकरच बिहारमधल्या गया , पटना आणि राजगीर इथे ह्या ३ प्रकारच्या भव्यदिव्य फिल्मसिटी उभ्या राहणार आहेत. त्यासाठी यूपी-बिहार या राज्यांची राज्य सरकारं आणि थेट कॅद्र सरकार सुद्धा विशेष लक्ष्य घालून येत्या ५ ते १० वर्षांत हे सगळॅ प्रकल्प पूर्ण करणार आहेत. आणि परदेशातल्या अनेक नामांकित कंपन्या गुंतवणू़क करतायत म्हटल्यावर खर्च किती असेल याचा विचारच करायला नको. बॉलीवूड मधली बडी धेंडं सुमडीत या कामात आपापलं योगदान देणार आहेत. कारण त्यांना मराठी माणसाचा त्रास होतो. त्यामुळे लवकरच आता एका पाठोपाठ एक म्हशीवर बसून जातील ते बिहारला.

यूपी-बिहार मधल्या काही जळकुट्या आणि माजुरड्या पत्रकारांनी आख्ख्या देशात एक नवीनच कॅम्पेन सुरूकेलीये, त्यांनी त्यांच्या कॅम्पेनमध्ये उधळलेली काही मुक्ताफळं इथे देत आहे :

"बिहार आता महाराष्ट्र आणि मुंबईतून आपली हिंदी चित्रपटसृष्टी परत काढून घेणार आहे. महाराष्ट्राला बॉलीवूड पोसतं, आणि तरीही त्यांना त्याची किंमत नाही. त्यामुळे हिंदी चित्रपटसॄष्टी जो काही रिव्हिन्यू मिळवते तो आता त्यांनी आम्हाला द्यावा. आम्ही वापरू तो पैसा. आणि नाहीतरी हिंदी हि यूपी आणि बिहारी लोकांचीच भाषा आहे, त्यामुळॅ हिंदी सिनेमे हे इथे यूपी आणि बिहारमध्ये बनले तर काय हरकत आहे. महाराष्ट्राने आपापले चित्रपट स्वतः बनवावेत आणि त्यात राज ठाकरे आणि देशमुख , वगैरे अशा लोकांना घ्यावं आपल्या चित्रपटात. म्हणजे मग आपोआप कळेल त्यांना (त्यांची लायकी)"
आता मला सांगा , परत काढून घ्यायला बिहारने कधी महाराष्ट्राला हिंदी चित्रपटसृष्टी दिली ?
उलट महाराष्ट्राने ती आख्ख्या देशाला दिली. तिची सुरूवातच मराठी माणसाने केली आणि तिही मुंबईत मग , हे कसला माज दाखवतायत आपल्याला ? एवढीच खाज होती तर, दादासाहेब फाळके जेव्हा चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवत होते, तेव्हा कुठल्या यूपी- बिहार्‍याने का नाही काही कर्तुत्त्व गाजवून दाखवलं त्यावेळी ?

आणि बॉलीवूड काय घंटा पोसणार महाराष्ट्राला , उलट महाराष्ट्रच पोसतो आख्ख्या देशाला, तिथे आमच्यापुढे केवळ एका बॉलीवूडचा काय खप ? आणि बॉलीवूड यूपी-बिहार ला हलवण्याची धमकी कुणाला देतायेत हे लोक, महाराष्ट्राला ? अहो, जा ना घेऊन्...आम्ही केव्हा पासून हाकलतोय तुम्हाला, निदान ह्या निमित्तानं तरी जाल तुम्ही आणि महाराष्ट्र सुखी होईल. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर चालते व्हा इथून.... ज्या दिवशी जाल त्याच दिवशीपासून तुम्हालाच तुमची लायकी कळेल..... महाराष्ट्राशिवाय शून्य आहात तुम्ही.

आपापल्या शहरात, राज्यात ज्या लोकांना कुत्रं सुद्धा विचारत नाही , असे दगड महाराष्ट्रात येऊन हिर्‍यासारखे चमकायला लागतात. आणि म्हणून आपल्या देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यातून सगळे लोक मुंबई-महाराष्ट्रात आपलं नशीब आजमावायला येतात , आणि महाराष्ट्राने आजवर कधीही कुणाला निराश केलेलं नाही, त्या प्रत्येकाचं नशीब ह्या आमच्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीने उजळून निघालंय. आणि त्याच लोकांनी नंतर महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला आपलं काम झाल्यावर ढुंXX दाखवलंय, हि गोष्ट वेगळी.

महाराष्ट्राशिवाय इतर कुठे बॉलीवूड फुलण्याचा एक टक्का जरी चान्स असता ना, ह्या सगळ्या कृतघ्न हरामखोरांनी केव्हाच महाराष्ट्रातून बॉलीवूड हलवलं असतं. आणि आजही , महाराष्ट्रावर उपकार करण्यासाठी म्हणून राहत नाहियेत ते इथे, त्यांची गरज म्हणून राहतायत. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी कधीही काहीही करायचं नाही, माज तेवढा दाखवायचा आणि तो अंगाशी आला, कि सरळ सरळ ठरलेली दोन वाक्यं म्हणायची, : " मुंबईने मला खूप प्रेम दिलंय आणि बाळासाहेबांचा मी आदर करतो. " कि झालं, मराठी माणूस खुश, मग तुम्ही काहीही करा , मराठी माणसावर हसा , आपल्या चित्रपटांतून त्यांची यथेच्छ चेष्टा करा, टिंगल करा. प्रत्यक्षात कधी दमडीचीही मदत न करता, टि.व्ही. वर असं दाखवा , कि जणू कित्येक वर्षांपासून हेच मराठी कुटुंबं पोसतायत. आणि मराठी माणूस चवीने हे सगळं बघतो , आणि शिवाय त्यांचे गोडवे गातो. अजून काय पाहिजे बॉलीवूडकरांना ? सुख सुख म्हणजे तरी दुसरं काय ? नाही का ?

असं मराठी माणसासारखं, स्वतःच्याच फजितीवर , अपमानावर , स्वतःच्याच अधोगतीवर हसणं जमणार आहे का बिहार्‍याना ?

तेव्हा केवळ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून आणि भव्यदिव्य फिल्मसिटी उभारून काही होत नसतं. त्यासाठी तिथल्या लोकांमध्ये आणि त्या राज्याच्या मातीत तसे गुणधर्म असावे लागतात. मन मोठ्ठं असावं लागतं. तुमच्याच्याने नाही जमायचं ते. त्यासाठी मराठी माणसाचं मोठ्ठ आणि मूर्ख मन हवं. तरच तुम्ही बॉलीवूड चालवू शकता , नाहीतर नाही.

मला प्रचंड अभिमान आहे मी भारतीय मराठी असल्याचा.

जय हिंद , जय महाराष्ट !

Monday, February 8, 2010

मराठीत नव्याने सुरू होणारी टि.व्ही. चॅनल्स हा मराठीच्या आंदोलनाचा पहिला मोठ्ठा विजय

महाराष्ट्रात येणार्या दिवसांत काय होणार आहे हे देवालाच माहीत... हाती येणारी प्रत्येक बातमी अशी काही भयानक स्वरूपात येते की त्या माहितीचा आनंद लुटावा कि दु:ख व्यक्त करावं , हेच कळेनासं झालंय.

आता मी कुठल्याही प्रकारचं प्रास्तविक करण्याच्या मूडमध्ये नसल्याने थेट मुद्द्याचं बोलतो...
महाराष्ट्रात आधी दूरदर्शन हे एकमेव टि.व्ही. चॅनल होतं, आता त्यात प्रगती होत होत, हळू हळू बाकीची चॅनल्स येत गेली आणि मराठी चॅनल्सचा पसारा वाढत गेला. १०-११ वर्षांपूर्वी झी टि. व्ही. ने मराठीत प्रथम 'अल्फा मराठी' नावाने मराठी चॅनल सुरू केलं, त्यच्याच मागेपुढे काही कालावधीने मग, ' टि.व्ही' हे मराठी चॅनल सुरू झालं. तेव्हापासून आज पर्यंत मराठी चॅनल्सचा पसारा बर्यापैकी वाढलाय.
म्हणजे सध्या मराठीत पुढील प्रमाणे टि.व्ही. चॅनल्स कार्यरत आहेत :

सह्याद्री (दूरदर्शन)
झी मराठी
मराठी
मी मराठी
स्टार प्रवाह
झी टॉकीज
साम मराठी
स्टार माझा
आय्.बी.एन. लोकमत
झी चोवीस तास

यांपैकी जवळपास सगळ्या चॅनल्सचे मालक अमराठी आहेत. (माझा मुद्दा इथे वेगळा आहे, त्यांच्या मराठीपणाबद्दल नाही. ) मला असं म्हणायचं आहे की , महाराष्ट्रात एवढे श्रीमंत मराठी उद्योगपती असतानादेखील एकही मराठी माणूस या उद्योगात का उतरत नाही ? आज देशात मनोरंजन क्षेत्रात अब्जावधी रुपयांची उलाढाल होते आहे, म्हणून मोठ्या प्रमाणावर 'बाहेरील' मंडळी इथे घुसतायत आणि महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेवर त्यांची पकड घट्ट रोवून उभे राहतायत. त्यांचं 'प्रस्थ' वाढत चाललंय. न्यूज चॅनल काढणं हे आज एक फॅड होऊन बसलंय. सरळ एखादि कंपनी रजिस्टर करून घेतात, प्रेस चं लायसन्स, वगैरे कागदपत्रं मिळवतात आणि मग यांचं न्यूज चॅनल सुरू...... आणि त्यात बिनडोक, वाचाळ , पक्षपाती, कृतघ्न, स्वार्थी आणि जनावरांपेक्षा हिन दर्जाची लोकं आणून बसवली जातात, १२५ कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात ज्यांना बाकीचे उद्योग सोडून महाराष्ट्राच द्वेष करणं, हे फार मोठं देशभक्तीपर काम वाटतं. आणि आपले लोक काहीही करत नाहीत, कारण त्यांना या गोष्टींची कधी माहितीच नसते. पत्रकारीतेचा काहीही अनुभव नसताना, पत्रकारितेच्या पदव्या विकत घेऊन कित्येक नवख्या तरूण-तरूणींना अशा टि.व्ही चॅनल्स वर आणि रेडीओ चॅनल्स वर मोकळं सोडलेलं असतं. विशेषतः त्या त्यांच्या .सी. स्टुडीओतल्या तरूणी- ज्यांच्या चेहर्यावर मेक-अप कमी आणि माज जास्त चढलेला असतो. त्यांच्या रेडीओ चंनल्स वर कधीही मराठी गाणी नसतात, मराठी न्यू़ज चॅनल असून सुद्धा त्यावर कधी मराठी बातम्या नसतात. त्यांच्या चॅनल्स मध्ये खास त्यांच्या राज्यातून आलेले लोक ते भरतात. मराठी तरूणांना संधी नसते.

यांच्याविषयी आपल्या लोकांकडे काय योजना आहेत ? कसं काय आवरणार यांना...... एखादा श्रीमंत मराठी माणूस का नाही उतरत या क्षेत्रात ? आणि का नाही चालू करत टि.व्ही चॅनल्स ? आणि जे उतरलेत त्यांना सुद्धा नीटसं झेपत नाहिये, शरद पवारांचा आणखी एक पुतण्या अभिजीत पवार या क्षेत्रात उतरला, आणि एक चॅनल काढलं - साम मराठी, पण काहीही उपयोग नाही. शेवटी तिथेही हे लोकच भरलेत. कांचन अधिकारी यांनी भव्यदिव्य उद्घाटन करून 'मी मराठी' सुरू केलं, पण त्याचीही घौडदौड हळू हळू चालली आहे.

झी उद्योगसमूहाचा मालक अमराठी असला तरी त्यांनी झीची धुरा मराठी माणसाच्या हातात दिली आहे, म्हणजे झी च्या आख्ख्या देशातल्या सगळ्या चॅनल्स चा अध्यक्ष त्यांनी एका मराठी माणसला नेमलंय. झी मराठी-झी चोवीस तास- झी टॉकीज च्या रूपाने झी ने खरोखरच १० वर्षांपासून मराठीची शान राखली आहे. तेव्हा त्यांच्याबद्दल बोलायला कुठेही जागा नाही. कौतुक करावं तेवढं थोडं. त्याचप्रमाणे रामोजी राव, यांचं 'ई मराठी' , आणि स्टार समूहाची - स्टार माझा, स्टार प्रवाह. आणि शेवटचं आय्.बी.एन. लोकमत.

बरं , हे टी.व्ही. चॅनल्स विषयी एवढं सगळं रामायण लिहिण्यामागचं खरं कारण म्हणजे मराठीत आता नव्याने येऊ घातलेली टि.व्ही. चॅनल्स. त्यांचं झालंय असं..... की हा सगळा टी.व्ही. चॅनल्स चा खेळ एका शब्दावर चालतो म्हणजे- टि.आर्.पी. [टि.आर्.पी. म्हणजे टि.व्ही. वरच्या कार्यक्रमांची लोकप्रियता मोजण्याचं एक प्रमाण आहे ते. टि.आर्.पी. जितका जास्त तितका तो कार्यक्रम लोकप्रिय] . तर गेल्या वर्षभरापासून विशेषतः मराठी माणूस आंदोलनाने मध्यंतरी जो वेग घेतला आणि आख्खा देश व्यापला. त्याचे परिणाम असे दिसून आलेत की, मराठी माणूस खर्‍या अर्थाने जागा झाला आहे, मराठी लोकांनी हिंदी कार्यक्रम बघणं अचानकपणे सोडून दिल्याने हिंदी कार्यक्रमांचा टि.आर्.पी धाडकन जमिनीवर कोसळला आहे, तो काही केल्या वर यायला तयार नाही.

स्टार प्लस, कलर्स, वगैरे सारख्य सर्वाधिक लोकप्रियता खेचणार्‍या टि.व्ही. चेनल्स चे रोजचे ब्लॉकबस्टर शो सुद्धा जमिनदोस्त झालेत. मराठी प्रेक्षक आता मराठी कार्यक्रम आनंदाने बघतात, त्यात झीच्या सारेगमप लिटल चॅम्प्स ने मागच्या वर्षी हिंदी चॅनल्स चा आंतर्राष्टीय स्तरावर धुव्वा उडवला होता. तेव्हापासून तर मराठी टि. व्ही. चॅनल्स ने जो वरचा गियर टाकला तो आजतागयत कायम आहे.

या सगळ्या गदारोळात टॉपला असणार्या बाकिच्या सिरियल्स आणि बिग बॉस, वगैरे मोठमोठे टि.व्ही. शोज सुद्धा दणदणीत आपटलेत. आणि ह्यात भर म्हणून कि काय मराठी माणसाने हिंदी चित्रपट बघणं सुद्धा बंद केलंय, त्यामुळे बॉलीवूड ला प्रचंड नुकसान झालंय. त्यात मराठी चित्रपट इतके उत्त्म यश मिळवतायत, ऑस्कर ला जातायत, राष्ट्रीय पुरस्कार मिळवतायत, त्यामुळॅ तिकडे नुसता धूर निघतोय कुठून कुठून ......काय विचारू नका काय चाललंय ते. ... पण जे चाललंय, ते 'लै भारी' चाललंय. आता समजलं का तुम्हाला , मराठी कडे बघून नाकं का मुरडतायत ते ? आणि महाराष्ट्राची रात्रंदिवस बदनामी का चालवली आहे ती ?

महाराष्ट्रात आता अनेक बड्या कंपन्या येतायत, चित्रपट निर्मितीमध्ये उतरातायत आणि टि.व्ही. , रेडीओ मध्ये सुद्धा उतरतायत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे :-

१) रिलायन्स उद्योग समूह (अनिल अंबानी) हे ३ मराठी टि.व्ही. चॅनल्स काढतायत :
बिग गौरव (मनोरंजन वाहिनी, सिरियल्स ,वगैरे साठी)
बिग चित्रपट (झी टॉकीज सारखं, दिवसभर फक्त चित्रपट)
बिग मराठी न्यूज (२४ तास बातम्या)

२) सहारा मराठी ( सिरियल्स )
३) 9X मराठी ( २४ तास बातम्या ) शक्यता कमी आहे.
४) संध्या म्रराठी
५) आमची मुंबई ( २४ तास बातम्या )
६) TV 9 ( २४ तास बातम्या )
७) P7 ( २४ तास बातम्या )
८) संगीत मराठी ( २४ तास गाणी, MTV सारखं )
९) मित्र मराठी ( २४ तास गाणी , MTV सारखं )
१० ) शाईन मराठी ( २४ तास गाणी, MTV सारखं )
११ ) कार्टून नेटगोल्ड ( २४ तास कार्टून्स )

तर अशी सगळ्या प्रकारची एकूण १३ ते १५ टि. व्ही. चॅनल्स घडाधड सुरु होणार आहेत.
याचा अर्थ 'फरक पडतोय' .... त्यांना मराठी माणसाची किंमत कळायला लागली आहे..... वणवा खरचंच पेट घेत आहे........

जय हिंद , जय महाराष्ट्र !

Sunday, February 7, 2010

इंग्रजी न्यूज चॅनलवर माधुरी दिक्षितने गायली मराठीतून अंगाई

मागच्याच वर्षी माधुरी दिक्षितला पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यावेळी सगळ्या पत्रकारांशी ती मस्तपैकी मराठीत बोलली आणि आख्ख्या महाराष्ट्राची मनं जिंकून घेतली. त्याचे काही हे गौरवाचे क्षण.....

त्याचं काय आहे, गेला आठवडाभर टि. व्ही. वर मराठीच्या अब्रूची वेशीवर टांगलेली लक्तरं पाहून मन अगदी विषण्ण झालं होतं, तेव्हा इंटरनेटवर सहज फेरफटका मारता मारता हे गोड क्षण माझ्या दृष्टीस पडले, ते पाहून जरा मनाला थोडं बरं वाटलं, म्हणून मग म्हटलं तुम्हालादेखील आवडेल...

त्याआधी एक गोष्ट खास म्हणून सांगतो, आपल्याकडे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर आजची मराठी तरुण पिढी मराठी बोलायला लाजते, बरेचसे मराठी पालक आपल्या मुलांना मराठीत बोलायला शिकवत नाहीत . मराठीत बोलणं हे त्यांना गरीब आणि दळभद्री माणसाचं लक्षण वाटतं.. अशा सगळ्या निर्लज्ज मराठी लोकांना मला आवर्जून सांगायचं आहे......की ...

चित्रपटविश्वातील आख्खं जग जिच्या पायाशी लोळण घेतं , ती लावण्यवती, सौंदर्यवती, नृत्यसम्राज्ञी माधुरी दिक्षित हिला आपल्या मातृभाषेचा- मराठीचा प्रचंड अभिमान आहे, अमेरिकेत राहून सुद्धा तिच्या घरात ती मराठीतच बोलते आणि विशेष म्हणजे तिच्या अमेरिकेत जन्मलेल्या (म्हणजे इंग्रजाळलेल्या) दोन्ही मुलांना ती आणि तिचा नवरा स्वतः मराठी शिकवतात.

मला तर असं वाटतं की अमेरिकेत जर मराठी शाळा असती तर तिने नक्की तिच्या मुलांना मराठी शाळेत घातलं असतं. आपल्या भारतात राहणार्‍या आणि मराठीत बोलायची लाज वाटणार्‍या लोकांना सांगा हे.... म्हणावं याला म्हणतात मराठी प्रेम.

तर हेच ते, माधुरी दिक्षित मराठीत बोलतानाचे काही गोड क्षण :-

१) माधुरी दिक्षित आणि तिचे पतिराज :-


२) माधुरी दिक्षितने तिच्या मुलांसाठी गायलेली मराठी अंगाई :-


३) माधुरीने गायलेलं मराठी गाणं :



काय वाटलं ना बरं मनाला.......???

Thursday, February 4, 2010

हिंदी आणि इंग्रजी मिडियावर , न्यूज चॅनल्स वर बंदी आणण्याचा मार्ग

पाणी आता डोक्याच्या वर जातंय असं नाही का वाटत ?
गेले काही दिवस रोज हे हिंदी-इंग्रजी चॅनलस वाले, मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची रात्रंदिवस बदनामी करतायत. आणि आपले मराठी राजकीय नेते, पत्रकार, मिडिया किंवा इतर संबंधित लोक काहीच कसं करत नाहीत ? सकाळी उठल्यावर टि.व्ही. लावा किंवा अगदी झोपताना टि.व्ही . लावा, तेच तेच पाहून कंटाळा नाही येत ? वाईट नाही वाटत ? दु:ख नाही का होत ?

ज्या गोष्टी आपले राजकीय नेते बोललेच नाही, त्या गोष्टी त्याचा विपर्यास करून दाखवल्या जातायेत आणि आख्खा देश मराठी माणसाचा तिरस्कार करतोय. प्रत्येक चॅनल मराठी माणसाची लक्तरं वेशीवर टांगायला निघालेत. या हिंदी-इंग्रजी मिडियाला थांबवत का नाही कुणी ?

या वर्षी महाराष्ट्राला ५० वर्षं पूर्ण होतायत, तसंच गुजरातला देखील ५० वर्षं पूर्ण होतायत. गुजरात सरकारने या कारणास्तव सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन वर्षभर वेगवेगळे कौतुक सोहळे ठेवलेत, उत्सव आयोजित केले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रात बघा काय चाललंय.

आज देशात मराठी-अमराठी चा जो वाद निकोपाला गेलाय, १०१% टक्के हे चॅनलवाले कारणीभूत आहेत. त्यांनी राजकीय नेत्यांची भाषणं मुद्दाम विष घालून पसरवली. जे भांडण केवळ दोन पक्षापुरतं मर्यादित होतं त्याला राष्ट्रीय स्वरूप दिलं, आणि त्यामुळे अनंत गैरसमज निर्माण होऊन त्यातून हि भांडणं उभी राहिलीयेत.

त्यामगच< आणखी एक व्यावहारीक कारण म्हणजे..... न्यूज चॅनल्स चा टि. आर. पी.
त्यांचं झालंय असं, की मराठी माणूस या आंदोलनामुळे , आपला मराठी माणूस थोडा का होईनात जागा झाला, आणि त्यांचा फायदा असा, की मोठ्या प्रमाणावर लोक हिंदी ऐवजी मराठी चॅनल्स बघायला लागले आणि हिंदी -इंग्रजी चॅनल्स लोक बघेनासे झाले, आणि त्यामुळॅच सगळ्यात जास्त बिझिनेस देणार्‍या महाराष्ट्रात हिंदी -इंग्रजी चॅनल्स चा टि.आर्.पी. खूपच खाली आलाय, असं दिल्लीत बसलेल्या हिंदी-ईंग्रजी तज्ञांचं मत आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना प्रचंड घाम फुटलेला आहे. आणि म्हणून मराठी माणूस या विषयावर काही दाखव्लं नाही , तर यांचं चॅनल कुत्रं सुद्धा बघत नाही. पण मराठी माणसाविषयी चांगलं कसं लिहायचं ? म्हणून मग त्यांनी आपली बदनामी करायला सुरूवात केली आहे. हे लोक इतके हरामखोर असतील असं वाटलं नव्हतं, पण ही खरी गोष्ट आहे.
कारण जेव्हा जेव्हा ते लोक, शिवसेना, मनसे, ठाकरे आणि मराठी माणूस या विषयी काहीही त्यांच्या फडतूस चॅनल्स वर दाखवतात ना, तेव्हा आख्खा देश आपापले कामंधंदे सोडून ते बघत बसतो, हे आता त्यांना कळून चुकलंय. कारण तेव्हा त्यांचा टि.आर. पी. हा गगनाला भिडलेला असतो.
या मराठी माणसाला शिव्या घालून आणि त्याची यथेच्छ बदनामी करून करूनच यांचा टि.आर.पी. वाढतो आणि या मुळॅच त्यांची चॅनल्स चालतात, मराठी माणसाविषयी हे विष आख्ख्या देशात हे पसरवतात आणि त्याचं खापर मात्र महाराष्ट्रावर, आणि आमच्या नेत्यांवर.
भारतीय असूनही एवढे निर्लज्ज आणि कृतघ्न कसे वागू शकतात हे लोक ?

आजपर्यंत आख्खा देश मराठी माणसाला , मोठ्या मनाचे, दिलदार, कलाप्रेमी, क्रीडाकुशल, शूरवीर, धाडसी, ई, ई, म्हणुन ओळखत होता, तोच देश आता मराठी माणसाला, भिकारी, गरीब, स्वार्थी, तिरसट, भांडखोर, थर्ड क्लास, कोत्या मनाचा, आणि देशद्रोही-समाजद्रोही म्हणुन ओळखायला लगलाय, याला सर्वस्वी जबाबदार केवळ हे न्यूज चॅनल्स वाले आहेत, ज्यांनी चुकीच्या बातम्या विष पेरून दाखवल्या आणि समाजात तेढ निर्माण केली.

महाराष्ट्रात जन्माला येणार्‍या नव्या पिढीला तर आमही समजावू शकू की सत्य काय आहे, पण देशात इतरत्र वाढणार्‍या तरूणांना- आणि नव्या पिढीला हे कोण जाऊन समजावणार. ते जे टि.व्ही. वर बघतात, त्यालाच तर सत्य समजणार आणि मग मागचा पुढचा कसलाही विचार न करता ते सुद्धा आपल्या विरुद्धच बोलणार, हातात शस्त्र घेऊन इथे येणार, विद्रोही होणार. याला जबाबदार कोण ?

आजवर मराठी कलाकारांनी, खेळाडूंनी, राजकारण्यांनी, लेखक-साहित्यिकांनी , इ. सगळ्यांनी जे जे कल्पानातीत यश मिळवलंय, जे कर्तुत्त्व करून ठेवलंय , त्याचा आता हळू हळू देशाला विसर पडत चाललाय. आणि बहुधा हेच त्यांना हवंय, म्हणुनच ते रात्रंदिवस महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर तुटून पडलेले असतात. की जेणे करून लोकांना आता मराठी हा शब्द ऐकला तरी कंटाळा यावा , आणि आपला पराकोटीचा तिरस्कार वाटावा.

यांना वेळीच आवरायला हवं , आणि त्यांचा माज कायमचा उतरवायला हवा. आणि तो ही व्यवस्थित विधायक मार्गाने, कायदेशीर पणे. त्यांच्या चॅनल्सची तोडफोड करून निष्कारणी पोलीसांची लफडी मागे लावून घेण्यापेक्षा कायदा वापरा. चढो... (सॉरी ...लढो ) मगर कायदेसे....

आता तुम्हाला प्रश्नं पडेल कि कसं ? तर त्यांचं उत्तर आहे माझ्याकडे ,
उदाहरण घ्यायचं झालं तर आपण , मनसेचं घेऊ. आतापर्यंत राज ठाकरे यांनी जी जी भाषणं केली , त्यात ते जे काही बोलले त्याचा चुकीचा अर्थ ह्या हिंदी-इंग्रजी चॅनल्स लावला आणि आख्ख्या देशभर गैरसमज पसरवले, ही जगजाहीर गोष्ट आहे. त्यामुळे मनसैनिकांनी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांनी, चाहत्यांनी, वगैरे, सरळ सरळ , त्या सगळ्या न्यूज चॅनल्स वर कोर्टात केसेस दाखल करायच्या.

राज ठाकरेंच्या भाषणांची हिंदी-इंग्रजी चॅनल्स वरची फुटेजेस तयार ठेवा, ती कोर्टात पुरावा म्हणून सादर करता येतील, की बघा, आमचा नेता अमुक अमुक बोलला, आणि त्याचा या न्यूज चॅनल्स त्यांच्या मनाने अर्थ लावला आणि तिखट-मीठ लावून , कडवटपणा टाकून, चुकीची माहिती आख्ख्या देशभर पसरवली. आणि त्यामुळे दोन समाजात कायमस्वरूपीची तेढ निर्माण झाली, आणि कायदा व सुव्यवस्था बिघडली. त्यामुळे या न्यूज चॅनल्स वर आणि खोट्या बातम्या आणणार्‍या बातमीदारावर, संपादकावर आणि कॅमेरामनवर सुद्धा कायमस्वरूपी किंवा काही वर्षांपुरती बंदी आणावी. रस्त्यावर येतील तेव्हा अक्कल ठिकाण्यावर येईल.

नुकतीच दक्षिण भारतात अशा २ टि.व्ही. चॅनल्स वर त्रासलेल्या लोकांनी खटले दाखल केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे कोर्टाने देखील त्वरीत हालचाली सुरू केल्यात तिथे, त्यामुळे लवकरच ते चॅनल आणि त्यांचे पत्रकार रस्त्यावर येतील नाहीतर सरळ 'आत' जातील.

अरे, हो....... सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली.....कलमं. भारतीय दंडविधान नुसार , IPC Section 153-A (दोन समाजात तेढ निर्माण करणे) आणि 505[2] (अफवा पसरवणे आणि चुकीची माहिती देणे) ....या कलमा अंतर्गत त्यांच्यावर खटले दाखल करता येतील. कायद्यातलं मला फारसं काही कळत नाही, त्याबाबत योग्य त्या माणसाचा सल्ला घेऊन मगच पाऊलं उचलावीत. पण कृपा करून आता वेळ वाया घालवू नका. .........

Wednesday, January 27, 2010

सौंदर्याची खाण पाहिली आम्ही पहिल्यांदा ; Maharashtrian Beauty Ready to Enter into Bollywood

सध्या मराठी माणसं अटकेपार झेंडा लावण्यात मग्न आहेत, हे बघून मन अगदी भरून येतं. मराठी चित्रपट तर कमाल दाखवत आहेतच पण मराठी कलाकारही सर्वत्र लखलखत आहेत. माझ्या मागच्याच पोस्ट मध्ये मी , 'जोगवा' या मराठी चित्रपटाला या वर्षीचे ५ राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचं सांगितलं. त्याचबरोबर, 'गंध' या मराठी चित्रपटाला देखील २ राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.

पण खरी गंमत जी मला तुम्हाला मला सांगायची , ती आपल्या मराठी मिडिया पर्यंत अजून पोचली नसावी कदाचित.. कारण त्याविषयी कुठल्याही वर्तमान पत्रात किंवा टि.व्ही. वर अजून काहीही दाखवण्यात आलेलं नाही.

आता जास्त ताणून न धरता सांगून टाकतो......तर बातमी अशी आहे कि........
यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा जो बंगाली चित्रपट आहे,
त्याचं नाव आहे :- ' अंतहीन '. आणि या चित्रपटात नायिकेच्या प्रमुख भूमिकेत जी नटी आहे, ती मराठी आहे , आपल्या पुण्याची आहे , तीचं नाव : राधिका आपटे.

पुण्यात जी 'आसक्त' नावाची नाट्यसंस्था आहे , त्यातली आहे ती. त्यामुळे मराठी नाटक, एकांकीका, चित्रपट, वगैरे करते ती. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या , 'समांतर' नावाच्या एका मराठी चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचं समीक्षकांनी चांगलं तोंडभरून कौतुक केलंय. पण तरीही अजून आपल्या मराठी मिडियाची नजर तिच्यावर कशी नाही पडली याचं मला आश्चर्य वाटतंय. तिची मुलाखत बघायला आवडेल मला टि.व्ही. वर.

सध्या तिच्या अभिनयाचं अख्ख्या बंगाल मध्ये प्रचंड कौतुक होतंय, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे तिथेले लोक आपल्या मुंबईतल्या हिंदी-ईंग्रजी मिडियासारखे कोत्या मानाचे नाहियेत , हे बघून खूप आंनद वाटला.

तर राधिका आपटेच्या पुढच्या प्रवासाला चांगल्या भरघोस शुभेच्छा !

हिच ती मराठी सौंदर्यवती.... राधिका आपटे !

Marathi Movie won National Awards ; मराठी चित्रपट 'जोगवा' ला ५ राष्ट्रीय पुरस्कार

मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट ......

२०१० हे नवं वर्षं मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ घेऊन आलंय... या वर्षीच्या सुरुवातीलाच 'नटरंग' , 'शिक्षणाच्याआयचा घो', 'झेंडा' , ' हरीश्चंद्राची फॅक्टरी' , इ . उत्तमोत्तम चित्रपट आलेले आहेत. मराठी चित्रपट रसिक या चित्रपटांचा मनसोक्त आस्वाद घेत असतानाच , त्यात आता आणखी एका आनंदाची भर पडली आहे, ती म्हणजे मराठी चित्रपट 'जोगवा' ला तब्बल ५ राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत :-

सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट : जोगवा
सर्वोत्कृष्ट अभिनेता : उपेंद्र लिमये
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन : अजय - अतुल
सर्वोत्कृष्ट गायक : हरीहरन
सर्वोत्कृष्ट गायिका : श्रेया घोषाल

तेव्हा 'जोगवा' चित्रपटाच्या अख्ख्या चित्रपट चमूला मनापासून हार्दिक शुभेच्छा......
असेच उत्तमोत्तम चित्रपट तयार करून आम्हां प्रेक्षकांचं मनोरंजन करत रहा.....

धन्यवाद !


तुम्ही पाहिलात कि नाही हा चित्रपट अजून ? पाहिला नसेल तर आवर्जून पहा...
या चित्रपटातील काही गाणी इथे देतो, मनमुरादपणे आनंद लुटा....

) नदीच्या पल्याड आईचा डोंगर...


) मन रानात गेलं गं...


) जीव रंगला..

Tuesday, January 26, 2010

ब्लॉगबद्दल थोडंसं : My intention to write this MARATHI Blog


नमस्कार मंडळी... राम राम !

सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
बर्‍याच दिवसांपासून मराठीत ब्लॉग लिहिण्याची ईच्छा होत होती पण काही केल्या वेळ मिळत नव्हता. शेवटी आज मुहूर्त लागला.

"मराठी आवाज " अशा नावाचा ब्लॉग सुरू करण्यामागे एक विशेष कारण आहे. या ब्लॉगवर मी आजच्या तरूण पिढीसाठीचे सगळे विचार एक वेगळ्या स्वरूपात, वेगळ्या पद्धतीने मांडणार आहे. आजचा महाराष्ट्र, आजचा 'मराठी माणूस' आणि आजचा 'मराठी तरूण' , मराठी भाषेवरून महाराष्ट्रात सुरू असलेलं रणकंदन , मराठी राजकारण, मराठी कला, चित्रपट, नाटक, आणि सर्वांत मुख्य (माझ्या दृष्टिने) - मराठी उद्योग जगत.

मला माहितीये , हे सगळॅ चावून चोथा झालेले विषय आहेत, आणि लोक आता या विषयांवरच्या चर्चेला कंटाळलेले आहेत. तरीही मी मुद्दाम हेच विषय निवडले आहेत. या सगळ्या बाबत आधी होऊन गेलेली चर्चा मी इथे नाही करणार्......या मागचं सगळ्यांत महत्त्वाचं कारण म्हणजे... मला या विषयावर काही नवीन मुद्दे लोकांसमोर आणायचे आहेत, ज्या बद्दल लोकांना सहसा माहिती नसते, किंवा ती करून दिली जात नाही. तो वेगळा दृष्टीकोन लोकांपुढे मांडण्यासाठी , म्हणून हा ब्लॉग .

त्याचबरोबर आज 'मराठी माणूस' जागतिक पातळीवर कुठे आहे, काय करतोय.
मराठी संस्कृतीची प्रगती कुठवर आहे.
मराठीने काय कमावलंय आणि काय गमावलंय.
कुठे नेमकं काय कमी पडतंय आणि का ?
मराठी बाबतचे वाद काय आहेत .....
आज देशासमोर बाकीचे महत्त्वाचे इतके प्रश्न असताना , आजच्या मराठी तरूणांनी या मराठीच्या वादांना कितपत महत्त्व द्यावं आणि का ? त्या मागची कारणं काय, उपाय योजना काय ?
या सगळ्या बाजूंचा अभ्यासपूर्ण लेखाजोखा मला इथे मांडायचा आहे....

आणि सगळ्यांत महत्त्वाचं कारण ... मला माझ्या स्वतःच्या स्वप्नातील महाराष्ट्राचं दर्शन लोकांपर्यंत पोचण्यासाठी मी हा ब्लॉगचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी मी माझी नैतिक जबाबदारी सांभाळून हा ब्लॉग लिहिणार आहे. उगाचच उग्र , जहाल आणि तीव्र भावनांना वाट करून देण्यासाठी हा ब्लॉग मी लिहिणार नाही. किंवा कुणा एका व्यक्तीवर-समूहावर-जाती-धर्मावर टीका सुद्धा करणार नाही... त्यामूळे या ब्लॉग वर दिलेल्या पोस्ट्स वर आपापल्या प्रतिक्रिया देताना, वाचकांनी सुद्धा कृपया याची नोंद घ्यावी आणि आपल्या भावनांना आवर घालावा, ही नम्र विनंती.

तर त्यामुळे , आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर ..या रंजक सफरीला सुरूवात करतो..... आपली साथ अपेक्षित आहे..... त्यामुळे या ब्लॉगला रोज अवश्य भेट देत जा , आपण आपले विचार आणि आपली मतं मुक्तपणे मांडावीत, त्यांचा आदर केला जाईल.

तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी तुळजाभवानी , महाराष्ट्राचा व समस्त मराठी मनाचा मानबिंदू - श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज ........... आणि सुखकर्त्या गणेशाला वंदन करून या ब्लॉगची पहिली पोस्ट आपल्या सगळ्यांसाठी प्रदर्शित करतो.......

धन्यवाद !
जय हिंद, जय महाराष्ट्र !

मित्रांना देखील कळवा